संघातून डच्चू दिल्यावर 'या' सुंदरीने दिला होता भारताच्या क्रिकेटपटूला विश्वास; त्यानंतर झाले रिलेशन खास...

ही सुंदरी नेमकी आहे तरी कोण, याचा विचार तुम्ही करत असाल...

भारतीय संघातून २००८ साली या क्रिकेटपटूला डच्चू देण्यात आला होता.

२००७ साली भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला. या संघात रॉबिन उथप्पा होता. पण एका वर्षात उथप्पाला संघातून डच्चू देण्यात आला.

जेव्हा उथप्पाला संघातून बाहेर काढण्यात आले तेव्हा त्याच्या पाठिशी ही सुंदरी ठामपणे उभी होती.

या सुंदरीचे नाव आहे शीतल गौतम.

शीतल उथप्पा ही टेनिसपटू होती. त्यामुळे दुसऱ्या खेळाडूचे दु:ख तिने समजले आणि उथप्पाला संघात परतण्याचा विश्वास दिला.

जेव्हा उथप्पाने संघात पुनरागमन केले त्यानंतर उथप्पा आणि शीतल यांनी लग्न केलं.