India vs England 2nd Test : चिटर...?; इंग्लंडच्या गोलंदाजांनी चेंडू कुरतडण्यासाठी लढवली शक्कल, स्टुअर्ट ब्रॉडचा बचाव!

या सर्व प्रकरणावर इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड म्हणतो आधी संपूर्ण व्हिडीओ पाहा. हे मुद्दाम केलेले कृत्य नाही... England bowler's do ball tampering in Lords test day 4?; Stuart broad come to defend, see pics

India vs England 2021 2nd test match live cricket score : लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. दोन्ही सलामीवीर धावफलकावर २७ धावा असताना माघारी परतले. भारताच्या पहिल्या डावातील ३६४ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं ३९१ धावा करत २७ धावांची आघाडी घेतली. पण, ही पिछाडी भरून काढण्यासाठी टीम इंडियाला दोन सलामावीरांची विकेट गमवावी लागली.

इंग्लंडचा पहिला डाव ३९१ धावांवर संपुष्टात आला. शमी दोन, इशांत शर्मा तीन आणि सिराजने चार विकेट्स घेतल्या. जो रूट ३२१ चेंडूंत १८ चौकारांसह १८० धावांवर नाबाद राहिला. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली.

रोहित शर्मानं सुरेख कव्हर ड्राईव्ह, पूल फटके मारून आक्रमक सुरुवात केली. पण, मार्क वूडनं भारताला धक्के दिले. लोकेश राहुल ३० चेंडूंत ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर १२व्या षटकात रोहित ( २१) बाद झाला. चेतेश्वर पुजारानं ३५ चेंडूनंतर पहिली धाव घेताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

विराट आक्रमक खेळ करताना दिसला आणि काही सुरेख फटके मारून प्रेक्षकांची वाहवाह मिळवली. पण, सॅम कुरनच्या बाहेर जाणारा चेंडू छेडण्याच्या नादात तो यष्टिरक्षकाच्या हाती झेलबाद होऊन माघारी परतला. चौथ्या दिवसाचा लंच ब्रेक झाला तेव्हा भारताच्या ३ बाद ५६ धावा करून २९ धावांची आघाडी घेतली. विराट २० धावांवर बाद झाला.

अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. या दोघांनी सावध खेळ करताना सामना अनिर्णीत राखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ही जोडी तोडण्यासाठी इंग्लंडच्या गोलंदाजांकडून चिटिंग झालेली पाहायला मिळाली.

दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ व कॅमेरून बँक्रॉफ्ट यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत सँड पेपर वापरून चेंडू कुरतडण्याचा प्रयत्न केला होता. तसाच प्रयत्न आज इंग्लंडच्या गोलंदाजांकडून झालेला पाहायला मिळाला.

मार्क वूड व ऑली रॉबिन्सन हे ते दोन गोलंदाज असल्याची शक्यता वर्तवरण्यात येत आहे आणि त्यांनी चेंडू कुडतडण्यासाठी बुटांच्या स्क्रूचा वापर केलेला पाहायला मिळत आहे. त्यांच्या या प्रयत्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता आयसीसी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.