मनाचा मोठेपणा!; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या यशाचं श्रेय खेळाडूंचेच, मला उगाच सन्मान दिला जातोय - राहुल द्रविड

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियानं ऐतिहासिक कामगिरी करताना सलग दुसऱ्यांदा कांगारूंच्या देशात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर असताना टीम इंडिया राखीव फळीसोबत मैदानावर उतरली आणि इतिहास घडवला.

या मालिकेत मोहम्मद सिराज, रिषभ पंत, शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर या युवा खेळाडूंनी आपला दबदबा दाखवताना टीम इंडियाच्या उज्वल भविष्याची प्रचिती दिली. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीत दी वॉल राहुल द्रविड याचाही खारीचा वाटा आहे.

ऑस्ट्रेलियात भारताने कसोटी मालिका २-१ने जिंकली. ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर विजयाकडे कूच करीत असताना ‘द वॉल’ राहुल द्रविडला पुढची पिढी यशस्वीरीत्या घडविल्याचे समाधान वाटले असेल.

१९ वर्षांखालील तसेच भारतीय ‘अ ’संघाची सूत्रे द्रविडने स्वीकारली त्या घटनेला आता सहा वर्षे झाली. पंत आणि वॉशिंग्टन पहिल्या तर शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी.

राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे ( एनसीए) प्रमुखपद भूषवित आहे. एनसीएत आलेल्या खेळाडूंमध्ये कुठलाही भेदभाव न करता त्यांच्या कर्तृत्वाला तसेच मेहनतीला प्रोत्साहन देणारा राहुल द्रविड पडद्यामागील खरा हिरो आहे. त्याच्यासारख्यांमुळे भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातात असल्याची खात्री अनेकांना पटली.

द्रविडने नेमके काय केले? - आधुनिक तंत्रज्ञान आधारित सराव आणि फिटनेसवर भर दिला. १९ वर्षांखालील प्रत्येक झोनमधील खेळाडूंच्या कामगिरीचा साप्ताहिक प्रगती अहवाल तयार केला. ‘अ’ संघासाठी करारबद्ध करण्यात येणाऱ्या खेळाडूंचा पूल ३० पर्यंत नेला. भारत ‘अ’ संघाचा विदेश दौरा वर्षातून दोनदा होईल, याची सोय केली. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांचा दर्जा सुधारला.

खेळाडू शोधले, जडणघडणही केली - खेळाडूंमधील कौशल्य विकास, तंत्र आणि शारीरिक फिटनेस सुधारणे या मुद्यांवर भर देण्यात आला. एखादा खेळाडू सरावादरम्यान आठवड्यात किती फटके खेळला. किती चुका झाल्या आदींचा लेखाजोखा द्रविडने ठेवला. त्या खेळाडूच्या चुका सुधारल्या. खेळाडू सामन्यादरम्यान कसा वागतो, याचाही शोध घेत पुढे त्या खेळाडूला अ संघातून खेळविण्याचा प्रयोग केला. मोहम्मद सिराज आणि मयांक अग्रवालसारख्या खेळाडूंना काही वेळा ‘अ’ संघात न खेळवता स्थानिक क्रिकेटचा अनुभव घेण्यास वाव दिला.

पण, द्रविडचं याबाबत मत काही वेगळं आहे. तो म्हणाला,''हा हा.. मला उगीच सन्मान दिला जातोय. हे खेळाडूंचं यश आहे.