"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं

Kapil Dev on Team India, IND vs PAK Asia Cup 2025: एका कार्यक्रमात आले असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले

आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने त्यांच्या मोहिमेची सुरुवात चांगली केली. टीम इंडियाने त्यांच्या पहिल्या सामन्यात यूएईचा ९ विकेट्सने पराभव केला.

आता रविवारी दुसऱ्या सामन्यात भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करेल. त्याआधी भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी एक मोठे विधान केले आहे.

कपिल देव एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले. यावेळी एका प्रश्नावरून कपिल देव यांनी पत्रकारांना चांगलेच खडेबोल सुनावले.

कपिल देव सुरुवातीला म्हणाले, "भारतीय संघ खेळेल आणि जिंकेल, ही आमची इच्छा आहे. सध्या भारतीय संघाचा फॉर्म पाहता मला विश्वास आहे की भारतच जिंकेल."

विराट-रोहितबद्दल कपिल म्हणाले, "तो त्यांचा काळ होता. ते चांगले खेळले. आता नवी पिढी मैदानात आली आहे. त्यांना स्वतःला क्रिकेटच्या मैदानात सिद्ध करावे लागेल."

यानंतर पत्रकाराने प्रश्न विचारला की, नव्या पिढीतील खेळाडूंमध्ये शुबमन गिल हा चांगला आणि प्रतिभावान खेळाडू म्हणून उदयास येतोय. त्याच्याबद्दल तुमचे मत काय?

या प्रश्नावर कपिल देव रोखठोकपणे म्हणाले, "तुम्ही भारतीय टीम बद्दल बोला, विशिष्ट व्यक्तीबद्दल चर्चा नको. जेव्हा एखादा खेळाडू चांगला खेळेल, तेव्हा तो आपोआपच सगळ्यांना दिसेल."

"संघाची कामगिरी महत्त्वाची असते. तुम्ही पाहता कोण कर्णधार-उपकर्णधार आहे. पण मी पाहतो की प्रत्येकजण देशाचे प्रतिनिधित्व करतो, जो आदराचा विषय आहे."