IND vs ENG, 4th T2O : OUT or NOT OUT?; तिसऱ्या अम्पायरच्या दोन निर्णयाचा टीम इंडियाला बसणार फटका?

Ind Vs Eng 4th T20 Live Update Score : रोहित शर्मा, लोकेश राहुल व विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) मिळालेल्या संधीचं सोनं केलं.

Ind Vs Eng 4th T20 Live Update Score : रोहित शर्मा, लोकेश राहुल व विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) मिळालेल्या संधीचं सोनं करताना इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं खणखणीत षटकार खेचून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्या आगमनाची झलक दाखवली.

पण, त्याच्या विकेटवरून नवा वाद निर्माण झाला. रिषभ पंत ( Rishabh Pant) व श्रेयस अय्यर ( shreyas Iyer) यांनी टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारून दिली. भारतानं २० षटकांत ८ बाद १८५ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरलाही ( Washington Sunder) चुकीच्या पद्धतीनं बाद ठरवण्यात आलं. आदिल राशिदचा पाय सीमारेषेला टच झाल्याचे दिसतानाही तिसऱ्या पंचांनी त्याला बाद ठरवले. Ind Vs Eng 4th T20, Ind Vs Eng 4th T20 Live Score

सूर्यकुमार यादवनं २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील पहिल्याच डावात अर्धशतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला. ( 50s in Maiden T20I inning for India) रॉबीन उथप्पा ( वि. पाकिस्तान, २००७), रोहित शर्मा ( वि. दक्षिण आफ्रिका, २००७), अजिंक्य रहाणे ( वि. इंग्लंड, २०११), इशान किशन ( वि. इंग्लंड, २०२१) यांनी असा पराक्रम केला आहे.

सूर्यकुमार ३१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ५७ धावांवर माघारी परतला. सॅम कुरनच्या गोलंदाजीवर डेवीड मलाननं त्याचा झेल टिपला. चेंडू ग्राऊंडला टच असल्याचे दिसत होते, पण मैदानावरील पंचांनी बाद दिल्यामुळे तिसऱ्या पंचांनीही निकाल कायम राखला. Ind Vs Eng T20 Match Today

सूर्यकुमारनं दुसऱ्या विकेटसाठी लोकेश राहुलसह ४२ ( २७ चेंडू) आणि चौथ्या विकेटसाठी रिषभ पंतसह ४० ( २८) धावांची भागीदारी केली. रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांची १८ चेंडूंत ३४ धावांची भागीदारी जोफ्रा आर्चरनं संपुष्टात आणली. रिषभ ३० धावांवर माघारी परतला. हार्दिक पांड्या ११ धावांवर बाद झाला, बेन स्टोक्सनं सुपरमॅन कॅच घेत त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. श्रेयस अय्यर १८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३७ धावांवर बाद झाला.

२०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरनं उत्तुंग फटका मारला, तो राशिदनं तो टिपला, परंतु त्याचा पाय सीमारेषेला चिकटल्याचे स्पष्ट दिसत होते. आधी सूर्यकुमार अन् आता वॉशिंग्टनच्या विकेटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.