IND vs ENG, 4th T20 : सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर झाले बाद अन् सोशल मीडियावर 'Virender'च्या नावानं शिमगा!

IND vs ENG, 4th T20 : भारत-इंग्लंड चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) यांना चुकीच्या पद्धतीनं बाद दिल्यानं मोठा वाद निर्माण झाला. ही दोघंही नाबाद असल्याचे स्पष्ट दिसत असताना तिसऱ्या पंचांनी त्यांना बाद दिले. क्रिकबजनं तिसऱ्या पंचांचे नाव जाहीर केलं अन् सोशल मीडियावर Virender Sharma नावानं शिमगा सुरू झाला.