फक्त इम्रान खानंच क्रिकेटपटूनंतर पंतप्रधान झालेले नाहीत...

इम्रान खान : इम्रान खान हे क्रिकेट जगतामधील नावाजलेले खेळाडू होते. पाकिस्तानने जो एकमेव विश्वचषक जिंकला तो त्यांच्याच नेतृत्वाखाली जिंकला.

नवाज शरीफ : फक्त इम्रान खानंच या यादीमध्ये नाहीत, तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफही या यादीमध्ये आहेत. शरीफ यांनी क्लब क्रिकेट खेळले आहे, त्याचबरोबर त्यांनी प्रथम श्रेणी सामनेही खेळले आहेत.

सर अॅलेस डगलस : युकेचे पंतप्रधानपद सर अॅलेस डगलस यांनी ऑक्टोबर 1963 ते ऑक्टोबर 1964 यांनी भूषवले होते. सर अॅलेस डगलस हे मिडलसेक्स या क्लबकडून 1924 ते 1927 या कालावधीमध्ये क्रिकेट खेळले होते.

सर फ्रान्सिस बेल : न्यूझीलंडचे माजी पंतप्रधान सर फ्रान्सिस बेल हेदेखील क्रिकेटपटू आहे. 10 ते 30 मे, 1925 या कालावधीमध्ये सर फ्रान्सिस बेल यांनी पंतप्रधानपद भूषवले होते. सर फ्रान्सिस बेल हे वेलिंग्टनकडून प्रथम श्रेणी सामने खेळले होते.

सर कॅमिसेसे मारा : फिजी या देशाचे संस्थापक म्हणून सर कॅमिसेसे मारा यांना ओळकले जाते. सर कॅमिसेसे मारा यांनी फिजीचे पंतप्रधानपद 1970 ते 1992 या कालावधीमध्ये भूषवले. त्याचबरोबर 1993 ते 2000 सालापर्यंत त्यांनी देशाचे राष्ट्रपतीपद भूषवले होते. सर कॅमिसेसे मारा हे देशासाठी दोन प्रथम श्रेणी सामने खेळले होते. 1953-54च्या न्यूझीलंड दौऱ्यावर ते खेळले होते.