हार्दिक पांड्याचे बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रॅम्प वॉक, कोण आहे ती?

दुखापतीतून सावरणाऱ्या हार्दिक पांड्याला टीम इंडियानं विश्रांती दिली आहे. त्यामुळेच वेस्ट इंडिज दौऱ्यातील तीनही संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. तंदुरुस्तीसाठी हार्दिक कसून मेहनतही घेत आहे. पण, फावल्या वेळेत तो बेबी सिटिंग आणि रॅम्प वॉकची संधीही सोडत नाही.

चार दिवसांपूर्वी हार्दिकचा बेबी सिटिंगचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

त्यात तो स्टार स्पोट्स वाहिनीवरील अँकर जतीन सप्रू याच्या मुलीची काळजी घेताना दिसला. हार्दिकने रविवारचा संपूर्ण दिवस सप्रूच्या मुलीसोबत खेळण्यात घालवला. त्यानं त्याला “Babysitting Sunday”असा टॅगही लावला.

गुरुवारी हार्दिक बॉलिवूडच्या अनेक स्टार नायिकांसोबत रॅम्प वॉक करताना दिसला. त्याच्यासोबत भाऊ कृणाल पांड्याही होता. पण, हार्दिकसोबत असलेल्या 'त्या' अभिनेत्रीची चर्चा अधिक रंगली होती.

कॅटरिना कैफ, करिना कपूर खान, करिष्मा आदी स्टार नायिका असताना एका अभिनेत्रीसोबतच्या हार्दिकच्या रॅम्प वॉकची चर्चा रंगली.

लिसा हेडन असे त्या अभिनेत्रीचे नाव होते.