Happy New Year 2026: विराट-अनुष्काच नव्हे तर या क्रिकेटर्संनी जोडीनं केलेले सेलिब्रेशन ठरलं लक्षवेधी

भारतीय संघातील अनेक क्रिकेटर्संनी आपल्या लाईफ पार्टरनसोबत नव्या वर्षाचे खास अंदाजात स्वागत केल्याचे पाहायला मिळाले.

देशभरात नव्या वर्षाचे अगदी धमाक्यात सेलिब्रेशन करण्यात येत आहे. भारतीय संघातील अनेक क्रिकेटर्संनी आपल्या लाईफ पार्टरनसोबत नव्या वर्षाचे खास अंदाजात स्वागत केल्याचे पाहायला मिळाले.

US0001465766 भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने होणारी पत्नी वंशिका सिंह हिच्यासोबतचा खास फोटो शेअर केला आहे. नव्या वर्षात मी नेहमी तुझ्यासोबत असेन, या कॅप्शनसह त्याने आपल्या पार्टनरवरील प्रेम व्यक्त केले आहे.

भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन याने सोफी शाइन हिच्यासोबतचे वर्षभरात एकत्र घालवलेल्या खास क्षण शेअर करत नव्या वर्षात नवे कपल गोल सेट करण्यासाठी उत्सुक असल्याचे दाखवून देणारी पोस्ट शेअर केली आहे.

भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याने संजनासोबतचा फोटो शेअर करत नव्या वर्षाच्या स्वागत केल्याचे पाहायला मिळाले.

जसप्रीत बुमराहनं फॅमिलीसोबतचा फोटो शेअर करत सेलिब्रेशनची खास झलक दाखवून दिली आहे.

२०२५ या वर्षाला बाय बाय करताना स्पायरमॅन मास्कसह अनुष्कासोबत खास फोटो शेअर करणाऱ्या विराट कोहलीनं नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अनुष्कासोबत आणखी एक खास फोटो शेअर केला आहे. परफेक्ट मॅचिंग आणि स्टायलिश लूकसह जोडीनं नव्या वर्षाचे खास सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळते.

रिंकू सिंह याने होणारी पत्नी आणि खासदार प्रिया सरोज हिच्यासोबतच्या साखरुपुड्यातील फोटोसह टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात झालेल्या निवडीसंदर्भातील खास गोष्टीला उजाळा देत नव्या वर्षाचे स्वागत केले आहे.