सौदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींवरही भारी पडतेय भारतीय क्रिकेटपटू, १३ वर्षांची असताना सोडलं होतं घर!

सौंदर्यात मोठमोठ्या बॉलिवूड अभिनेत्रींना मात देणाऱ्या भारतीय महिला क्रिकेटपटू हर्लीन देओल हिचा आज २३वा वाढदिवस...

२१ जून १९९८ साली चंडीगढ येथे जन्मलेल्या हर्लीननं २०१९मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. (Harleen Deol/Instagram)

आतापर्यंत तिनं भारताकडून एक वन डे व ९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत आणि वन डेत तिला दोनच धावा करता आल्यात, तर ट्वेंटी-२०त ११० धावा व ६ विकेट्स तिच्या नावावर आहेत.

हर्लीन ही भारतीय संघातील मधल्या फळीची फलंदाज आहे आणि ती अन्य खेळांतही तिनं प्राविण्य मिळवलं आहे. सुंदरतेच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेंत्रींनाही टक्कर देते. (Harleen Deol/Instagram)

८ वर्षांची असताना तिनं भाऊ व शेजारील मुलांसोबत गली क्रिकेटपासून सुरूवात केली. ९ वर्षांची असताना तिनं शालेय क्रिकेट संघाचे राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व केले.

१३ वर्षांची असताना क्रिकेटसाठी ती हिमाचलला गेली आणि तिथे क्रिकेटचे शास्त्रशुद्ध धडे गिरवले. (Harleen Deol/Instagram)

हर्लीन अभ्यासातही हुशार आहे. तिनं १० वी व १२वीत ८० टक्के गुण मिळवले होती. ती एक उत्तम अभिनेत्रीही आहे. हर्लीनचा मोठा भाऊ डेंटिस्ट आहे.

हर्लीन क्रिकेटव्यतिरिक्त हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल हेही खेळ खेळते. शालेय स्तरावर ती उत्तम धावपटू होती. (Harleen Deol/Instagram)

मुलांसोबत क्रिकेट खेळताना शेजारचे तिच्या आईकडे तिची तक्रार करायची. पण, शेजाऱ्यांच्या या वागण्याचा हर्लीननं खेळावर परिणाम होऊ दिला नाही आणि कुटुंबीयांनीही तिला सपोर्ट केलं. (Harleen Deol/Instagram)