Happy Birthday : गौतम गंभीरची 'प्यार वाली लव्ह स्टोरी'!

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा जन्म 14 ऑक्टोबर 1981ला दिल्लीत झाला.

2019मध्ये गंभीरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणुकही लढवली. लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीतून गंभीर निवडून आला.

गौतम गंभीरनं 28 ऑक्टोबर 2011मध्ये दिल्लीत राहणाऱ्या नताशा जैनशी विवाह केला.

नताशा जैनच्या सौंदर्यासमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडतील.

गौतम आणि नताशा यांचा लव्ह मॅरेज आहे, परंतु ते सर्वांना अरेंज मॅरेज असल्याचे सांगतात.

गौतमचे वडिल दीपक गंभीर टेक्सटाईल उद्योगपती आहेत आणि नताशाचे वडीलही उद्योगपती आहेत आणि ते दोघेही चांगले मित्र आहेत.

नताशानं लंडन बिजनेस स्कूलमधून बीबीए केले आहे.