Happy Birthday Dhoni : महेंद्रसिंग धोनीच्या हेअर स्टायलिस्टनं पोस्ट केलं कॅप्टन कूलचे Unseen Photo!

महेंद्रसिंग धोनी आज 39वा वाढदिवस साजरा करत आहे. कोरोना व्हायरसमुळे क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या असून धोनी त्याच्या कुटुंबीयांसह रांचीतील फार्म हाऊसवर आहे. क्रिकेटच्या मैदानावर मास्टरमाईंड असलेला धोनी व्यावसायातही तितकाच तल्लख आहे. धोनीनं अनेक व्यावसायांत गुंतवणुक केली आहे आणि त्याचा नेट वर्थ हा जवळपास 8 अब्ज 35 कोटी इतका आहे. एका वृत्तानुसार जाहिरातींमधून धोनी जवळपास 195 कोटीहून अधिक कमावतो. जाहिरातीत त्याच्या लुकची काळजी घेण्याचं काम प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट सपना भवनानी या पाहतात. त्यांनी धोनीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचे काही Unseen Photo पोस्ट केले आहेत.