Happy Birthday: समाजाचा विरोध झुगारून अजित आगरकरनं केलं लग्न अन्...

टीम इंडियाचा माजी गोलंदाज अजित आगरकरचा आज 42वा वाढदिवस साजरा करत आहे. 4 डिसेंबर 1977मध्ये आगरकरचा जन्म झाला. त्यानं 191 वन डे सामन्यांत 288 विकेट्स घेतल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असताना सर्वात हँडसम भारतीय क्रिकेटपटू म्हणून आगरकरची वेगळीच ओळख होती. त्यामुळेच त्याची लव्ह स्टोरीही बॉलिवूड चित्रपटासारखी आहे.

आगरकरने 1999 मध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केले. त्याच दरम्यान त्याची ओळख फातिमासोबत झाली.

फातिमा ही आगरकरचा खास मित्र मजहर याची बहीण... मजहरसोबतच्या मैत्रीमुळेच आगरकरची फातिमाशी ओळख झाली आणि त्यांच्यातही मैत्री झाली

सामन्यादरम्यान फातिमाही भावासोबत स्टेडियममध्ये यायची आणि तेव्हाच आगरकर व तिच्या प्रेमाला सुरुवात झाली

त्यानंतर ही दोघं एकमेकांना भेटू लागले आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले

दोघांचे धर्म वेगवेगळे असल्यानं त्यावेळी बरीच टीका झाली. आगरकर हा मराठी ब्राह्मण, तर फातिमा ही मुस्लीम होती.

दोघांच्या घरच्यांनाही हे लग्न मान्य नव्हतं. पण, धर्माची ही भींत तोडून या दोघांनी 9 फेब्रुवारी 2002मध्ये लग्न केले.

या जोडप्याला एक मुलगाही आहे आणि त्याचं नाव राज असं आहे.

आगरकरची पत्नी मुंबईत मॅनेजमेंट सल्लागार आहे.