गोल्डन ओव्हर ज्यात धावा होतील दुप्पट; पाच असे नियम जे आणखी वाढवू शकतील ट्वेंटी-२०चा थरार!

क्रिकेटला अधिक रोमांचक बनवण्यासाठी कसोटी क्रिकेटच्या काळात वन डे क्रिकेटचे स्वरूप आले, ६०-६० षटकांचे वन डे सामने ५०-५० षटकांचे झाले. आता तर झटपट म्हणजेच २०-२० षटकांचे, १०-१० षटकांचे अन् १०० -१०० चेंडूचे सामने होऊ लागले आहेत. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप फक्त ट्वेंटी-२० क्रिकेटलाच मान्यता आहे. Here are 5 new rules which can make T20 cricket more interesting

जगभरातील अनेक व्यावसायिक लीग या ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्येच खेळवल्या जातात. इंडियन प्रीमिअर लीगनं ( IPL) तर ट्वेंटी-२० फॉरमॅटला वेगळी उंची गाठून दिली. या झटपट क्रिकेटमध्ये पाच नव्या नियमांचा समावेस केल्यास, यातील थरार आणखी वाढू शकतो...

चला जाणून घेऊयात पाच नवीन नियम, ज्यानं वाढेल थरार...

ख्रिस गेल, आंद्रे रसेल, एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली आदी स्फोटक फलंदाज समोर असताना प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या मनात धडकी भरणे साहजिकच आहे. अगदी सहजतेनं ही मंडळी चेंडू सीमापार पाठवतात. पण, त्यांनी कितीही उत्तुंग फटका मारला किंवा चेंडू अगदी स्टेडियमबाहेर पाठवला, तरी त्यांना फक्त ६ धावांवर समाधान मानावे लागते. या नियमात ट्विस्ट आणल्यास.. म्हणजे चेंडू १०० मीटर लांब टोलवल्यास ८ धावा, असा नियम आणल्यास फलंदाजांकडून आणखी उत्तुंग षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल.

ट्वेंटी-२०त एक गोलंदाज फक्त चारच षटकं फेकू शकतो. अशात डेथ ओव्हरमध्ये प्रमुख गोलंदाजाची षटकं राखून ठेवावी लागतात किंवा त्याची चार षटकं पूर्ण झाली असल्यास त्याची उणीव जाणवते. अशावेळी त्या दिवशी चांगली गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांच्या षटकांची मर्यादा चारहून अधिक केल्यास संघासाठी ते फायद्याचे ठरू शकते. याचा फायदा दोन्ही संघांना समान उचलता येऊ शकतो आणि त्यामुळे अखेरच्या षटकापर्यंतचा थरार आणखी नाट्यमय बनू शकतो.

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगध्ये X फॅक्टर हा नवा नियम आणला गेला आहे. त्यात सामन्यातील १० षटकं पूर्ण झाल्यानंतर खेळाडूची अदलाबदल करता येते. फलंदाजी करणारा संघ अतिरिक्त फलंदाज खेळू शकतो, तर गोलंदाजी करणारा संघ गोलंदाजाला खेळवू शकतात. अट एकच बदल म्हणून मैदानावर येणारा खेळाडू अंतिम ११ चा सदस्य नसावा किंवा आधी फलंदाजी किंवा गोलंदाजी करून तंबूत गेलेला नसावा.

षटकांचा वेग कायम राखणे हे या झटपट खेळातही महत्त्वाचे आहे. त्यामुळे एखाद्या संघाकडून त्या नियमाचे पालन न झाल्यास त्यांना पाच गुणांची पेनल्टी बसवण्यात यावी.

सामन्यातील असं एक षटक कि ज्यात संघानं केलेल्या धावा या दुप्पट मोजल्या जातील. यात अतिरिक्त धावांचाही समावेश असेल.