जो रुटनं मोडला सचिनचा विक्रम! जयसूर्याही टाकलं मागे

जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांचा रेकॉर्ड

लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात इंग्लंडच्या जो रुटनं अवघ्या २८ धावांवर जसप्रीत बुमराहचा शिकार झाला. पण विकेट गमावण्याआधी त्याने खास विक्रमाला गवसणी घातली.

भारत-इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिकेत इंग्लंडच्या मैदानात सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडीत काढत तो या यादीत आघाडीवर पोहचला आहे.

सचिन तेंडुलकरपेक्षा एक कसोटी सामना कमी खेळत जो रुटनं भारत-इंग्लंड द्विपक्षीय कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केलाय.

आपल्या घरच्या मैदानात भारतीय संघाविरुद्ध खेळताना जो रुटनं आतार्यंत १६ कसोटी सामन्यात १६०२ धावा केल्या आहेत.

इंग्लंडच्या मैदानात यजमान संघाविरुद्धच्या १७ कसोटी सामन्यात सचिन तेडुंलकरनं १५७५ धावा केल्या आहेत.

जो रुट आणि तेंडुलकर पाठोपाठ या यादीत राहुल द्रविड १३७६ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

अ‍ॅलिस्टर कुक घरच्या मैदानात खेळताना भारतीय संघाविरुद्ध ११९६ धावांसह चौथ्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ सुनील गावसकर /यांनी इंग्लंडच्या मैदानात यजमान संघाविरुद्ध केलेल्या ११५२ धावांसह या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रुटनं सनथ जयसूर्याला मागे टाकत नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. रुटच्या खात्यात आता २१०३३ धावा जमा आहेत.