'ती'चा तिच्याशी विवाह; क्रिकेटमध्ये नवीन समलैंगिक जोडपं!

क्रिकेट, हॉकी, अॅथलेटिक्स, फुटबॉल, रग्बी आदी खेळांत समलैंगिक विवाहाची प्रकरणं अनेक आहेत. त्यात आणखी एका क्रिकेटपटू जोडप्याची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू डेलिसा किमिंस आणि लॉरा हॅरिस यांनी त्याचे समलैंगिक संबध जगजाहीर केले.

महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बन हिट संघाने जेतेपद जिंकल्यानंतर आपल्या भावना लॉरासमोर व्यक्त करणार असल्याचे डेलिसानं ठरवलं होतं आणि त्यानुसार तिनं केलंही.

2018-19च्या महिला बिग बॅश लीगच्या जेतेपदानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज डेलिसानं लॉराला प्रपोज केले. ब्रिस्बन हिट संघानं अंतिम सामन्यात सिडनी सिक्सर्सचा पराभव केला.

लॉरानेही डेलिसाच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि या दोघींनी एकत्र असल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

डेलिसानं 2008मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2009 पासून तिनं विश्रांती घेतली. 2014च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमधून तिनं कमबॅक केले आणि त्यानंतर ती सातत्यानं संघाची सदस्य आहे.

लॉरा मागील तीन हंगामापासून बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बन हिट संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. 2016-17मध्ये तिनं क्विन्सलँड संघाकडून स्थानिक क्रिकेट लीगमध्ये पदार्पण केले होते.

अॅमी सॅथरवेट आणि ली ताहूहू ( न्यूझीलंड)

अॅलेक्स ब्लॅकवेल आणि लिन्सी आस्केव (ऑस्ट्रेलिया)

मीगन स्कट आणि जेस होलॉक ( ऑस्ट्रेलिया)

जेस जोनसन आणि सारा वर्न ( ऑस्ट्रेलिया)

डॅन व्हॅन निएकर्स व मॅरीझन्ने कॅप्प ( दक्षिण आफ्रिका)