MS Dhoni, T20 World Cup: 24 सप्टेंबर! आजचाच तो दिवस, समोर पाकिस्तान उभा होता; धोनीने T20 वर्ल्डकप जिंकला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 08:45 AM2021-09-24T08:45:54+5:302021-09-24T09:00:40+5:30

T20 world cup 2007 India beat Pakistan on 24 sept 2007: ही मॅच तर रोमांचक होतीच, परंतू शेवची ओव्हर तर त्याहून अधिक रोमांचक होती. दोन्ही देशात सन्नाटा पसरला होता. कोण जिंकेल, कोण हरेल. कारण एका ओव्हरमध्ये 13 रन्स हवे होते. अन् . धोनीने सर्वांना चकित करणाना निर्णय घेतला. जोगिंदर शर्मावर डाव खेळला.

24 सप्टेंबर 2007 (27 September 2007) चा दिवस आठवतोय? महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि भारतासाठी खूप महत्वाचा दिवस होता. सुवर्णाक्षरांत लिहिला गेला. आजपासून बरोबर 14 वर्षांपूर्वी टी-२० वर्ल्डकपची फायनल (T20 World Cup 2007) होती. समोर पाकिस्तान उभा होता.

टीम इंडियाने (Indian Cricket Team) पाकिस्तानला हरवत चषक जिंकला होता. ही फायनल साऊथ आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये खेळविली गेली. (India Won T20 World Cup 2007 Against Pakistan on this day)

हा सामना आजही खास मानला जातो म्हणजे भारतासमोर कायमचा शत्रू पाकिस्तान उभा ठाकला होता. धोनीच्या नेत-त्वात पाकिस्तानला हरवून भारताने इतिहास रचला होता. या फायनलमध्ये भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 157 रन्स बनविले होते.

ही मॅच तर रोमांचक होतीच, परंतू शेवची ओव्हर तर त्याहून अधिक रोमांचक होती. दोन्ही देशात सन्नाटा पसरला होता. कोण जिंकेल, कोण हरेल. कारण एका ओव्हरमध्ये 13 रन्स हवे होते.

धोनीसमोरही मोठा पेच होता, कोणाला ही ओव्हर द्यायची. समोर पाकिस्तानचा फलंदाज मिसबाह उल हक होता. धोनीने सर्वांना चकित करणाना निर्णय घेतला. जोगिंदर शर्मावर डाव खेळला.

शेवटची ओव्हर सुरु झाली, इकडे भारतीय प्रेक्षकांची धाकधूक सुरु झाली. जोगिंदर नवखा खेळाडू. त्याच्याकडे महत्वाची ओव्हर दिली, झाले, संपले अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या.

जोगिंदरने पहिला चेंडू टाकला. वाईड निघाला. झाले, 6 चेंडूत 12 धावा. जोगिंदरने दुसरा चेंडू टाकला. मिसबाहला तो खेळता आला नाही. 5 चेंडूवर 12 रन्स हवे होते.

दुसरा चेंडू जोगिंदरने फुलटॉस टाकला, मिसबाहने सिक्स मारला. पारडे एका चेंडूत फिरले. भारताच्या गोटात सन्नाटा आणि पाकिस्तानच्या गोटात जल्लोष सुरु झाला. चार चेंडूंवर 6 रन्स हवे होते.

जोगिंदरने तिसरा चेंडू टाकला मिसबाहने स्कूप शॉट खेळला. वाटले आता भारताचा खेळ खल्लास. पण हवेत झेपावलेला चेंडू श्रीसंतच्या हातात विसावला आणि अख्खे स्टेडिअम दणाणले.

भारताने मॅच जिंकली होती. जोगिंदर शर्मा हिरो ठरला होता. धोनीने इतिहास रचला होता. हाच तो दिवस! 27 September 2007.