01:28 PM
01:18 PM
12:37 PM
12:08 PM
12:06 PM
12:06 PM
09:38 AM
09:21 AM
Published: March 8, 2021 01:18 PM | Updated: March 8, 2021 01:21 PM
BCCI नं रविवारी इंडियन प्रीमिअर लीगचं ( Indian Premier League 2021) वेळापत्रक जाहीर केले. ९ एप्रिलपासून आयपीएलच्या ( IPL 2021 Schedul) १४व्या पर्वाला सुरुवात होणार आहे आणि ३० एप्रिलला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) प्ले ऑफ आणि अंतिम सामना होणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे साखळी फेरीचे सामने चार ठिकाणांवरच खेळवण्यात येणार आहेत, तर कोणत्याही संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर खेळता येणार नाही. ( All the league matches will be played in neutral venues so no home advantage for any IPL team this year)
मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू या सहा शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत. आयपीएलच्या १४ व्या पर्वातील पहिले ३६ सामने चेन्नई, अहमदाबाद, मुंबई व दिल्ली येथे होतील आणि उर्वरित २० सामने बंगळुरू व कोलकाता येथे होतील. पश्चिम बंगालमध्ये मार्च अखेरीस ते एप्रिल अखेरीस निवडणुका असल्यानं हा निर्णय घेण्यात आला.
साखळी फेरीत ५६ सामने होतील आणि चेन्नई, मुंबई, कोलकाता व बंगळुरू येथे प्रत्येकी १० सामने खेळवण्यात येतील, तर अमदाबाद व दिल्ली येथे ८-८ सामने होतील. यंदाच्या पर्वात सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्या घरच्या मैदानावर एकही सामना होणार नाही.
आयपीएल वेळापत्रकावरून फ्रँचायझी मालकांनी नाराजीचा सूर धरला आहे. पंजाब किंग्सची सह मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ( Punjab Kings’ co-owner Preity Zinta ) हीनं वेळापत्रकावर प्रतिक्रिया दिली आहे. ''अखेर आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झालं. पंजाब किंग्स पहिला सामना आमच्या मुंबईत खेळेल आणि तिथून चेन्नई, अहमदाबाद व बंगळुरू येथे जाईल. एकाही संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर खेळता येणार नसल्यान थोडं विचित्र वाटतंय आणि शिवाय प्रेक्षकही मॅच पाहायला नसतील.''
एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यानं चक्क महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) या चर्चेच ओढलं आणि सांगितलं की,''अशा प्रकारचं वेळापत्रक तयार करून तुम्ही धोनीला अखेरच्या आयपीएलमध्ये चेन्नईत खेळण्यापासून रोखत आहात. प्रेक्षक येणारच नसतील तर CSKला चेन्नईत आणि MI ला मुंबईत खेळण्यापासून रोखण्यामागचं कारण काय?''
''दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे मुंबईचे खेळाडू खेळत आहेत आणि DCचे तीन सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तसेच पंजाबच्या संघात लोकेश राहुल, मयांक अग्रवाल व प्रशिक्षक अनिल कुंबळे या बंगळुरूच्या खेळाडूंचा समावेश आहे. या तिघांनाही या खेळपट्टीची जाण आहे आणि तेथे ते पाच सामने खेळणार आहेत. अशात बीसीसीआयचा प्लॅनला काहीच अर्थ राहत नाही,''असेही अधिकाऱ्यानं Cricbuzz ला सांगितले.
संघांच्या बायो-बबल वरूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयपीएल वेळापत्रत्रकानुसार संघांना चार शहरांमध्ये प्रवास करावा लागणार आहे आणि अशानं कोरोनाचं संकट वाढणार आहे. मुंबईत तर कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
One of the IPL franchise official said the BCCI are denying MS Dhoni to play his potential last IPL in Chennai. If there are to be no crowds, what stops CSK to play in Chennai and Mumbai Indians to play in Mumbai.