Big News : 'या' दिवशी निवृत्ती घेणार विराट कोहली; पीटरसनसोबतच्या संवादात केला खुलासा

भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. कॅप्टन कुल धोनी गेल्या 9 महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

इंडियन प्रीमिअर लीगच्या कामगिरीवर धोनीचे टीम इंडियातील पुनरागमन अवलंबुन होतं, परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएलवरही अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळे धोनी लवकरच निवृत्ती जाहीर करेल, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

पण, धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं निवृत्तीबाबत मोठं विधान केलं आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हीन पीटरसन याच्याशी इंस्टाग्रामवरून व्हिडीओ कॉलवर त्यानं हा खुलासा केला.

पीटरसननं या लाईव्ह चॅटमध्ये कोहलीला बरेच वैयक्तिक प्रश्न विचारले.

मैदानावर कोणाबरोबर फलंदाजी करताना जास्त मजा येते? या प्रश्नावर कोहलीनं महेंद्रसिंग धोनी आणि एबी डिव्हिलियर्स या दोन खेळाडूंची नावं घेतली. धाव घेताना या दोन्ही फलंदाजांचा वेग अप्रतिम असल्याचं कोहलीनं सांगितलं.

त्यानं चिकू हे नाव कोणी दिल्याचेही सांगितले. कोहलीली चिकू हे नाव त्याच्या रणजी संघाच्या प्रशिक्षकानं दिले आणि महेंद्रसिंग धोनीनं ते फेमस केलं. धोनी यष्टीमागून कोहलीला चिकू म्हणूनच हाक मारायचा.

मांसाहारीपासून शाकाहारी का बनला? RCB अजूनही आयपीएल का जिंकू शकली नाही? आदी प्रश्नही पीटरसननं यावेळी त्याला विचारले.

त्यावेळी कोहलीच्या निवृत्तीचा प्रश्न आला. त्यावर कोहली म्हणाला, मैदानावर खेळताना मी माझे सर्वस्व पणाला लावतो आणि तेव्हा माझी एनर्जी दुप्पट असते. पण, जेव्हा मी मैदानावर 120 टक्के योगदान देण्यास अयशस्वी ठरेल, त्या दिवशी निवृत्ती जाहीर करेन.

तो पुढे म्हणाला, मी स्वतःला वचन दिले आहे. ज्यादिवशी मी मैदानावर हवी तसे योगदान देण्यात अपयशी ठरेन, त्यादिवशी निवृत्ती घेईन.

गोलंदान मला नेहमी म्हणतात की तू विकेट घेतल्याचा जल्लोष आमच्यापेक्षा अधिक जास्त एनर्जीनं साजरा करतोस. पण, मी असाच आहे आणि त्यावर मी काहीच करू शकत नाही.

दरम्यान या दोघांची चर्चा रंगात आलेली असताना अनुष्का शर्मानं पती विराटला जेवण करण्यास बोलावले आणि चर्चा थांबवावी लागली.