राज कुंद्राच्या अटकेनंतर अजिंक्य रहाणे ट्रोलर्सच्या निशाण्यावर, हे आहे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 12:49 PM2021-07-20T12:49:16+5:302021-07-20T12:55:42+5:30

Raj Kundra Arrest News: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई क्राईम ब्रँचने पोर्नोग्राफी प्रकरणात सोमवारी रात्री बेड्या ठोकल्या. अश्लिल चित्रपट बनवल्याचा आणि अॅपच्या माध्यमातून पब्लिश केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मात्र राज कुंद्राला झालेल्या अटकेनंतर भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई क्राईम ब्रँचने पोर्नोग्राफी प्रकरणात सोमवारी रात्री बेड्या ठोकल्या. अश्लिल चित्रपट बनवल्याचा आणि अॅपच्या माध्यमातून पब्लिश केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मात्र राज कुंद्राला झालेल्या अटकेनंतर भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

अजिंक्य रहाणे आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. तेव्हा त्याने १९ ऑक्टोबर २०१२ रोजी राज कुंद्रा याला टॅग करून एक ट्विट केले होते. त्यात सर, तुम्ही चांगलं काम करताय, असं अजिंक्य रहाणे म्हणाला होता. त्याला उत्तर देताना राज कुंद्रा याने त्याचे आभार मानले होते. आभारी, तुम्ही अवश्य या आणि लाईव्ह पाहा, असे राज कुंद्रा अजिंक्य रहाणेला म्हणाला होता.

त्या ट्विटवरूनच आता रहणे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. दरम्यान, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात राज कुंद्राविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच्यावर अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता अजिंक्य रहाणेचे जुने ट्विट व्हायरल होऊ लागले आहे.

२०१२ मध्ये अजिंक्य रहाणेने काही कामासाठी राज कुंद्रा याचे कौतुक केले होते. त्यावेळी राज कुंद्रा हा आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा सहमालक होता.

मात्र आता कुंद्राला अटक झाल्यावर किरकोळ निमित्त शोधणाऱ्यांनी अजिंक्य रहाणेचे जुने ट्विट शोधून काढत त्याच्यावर निशाणा साधला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!