KKRचा 'लाड'का मुंबईकर खेळाडू चढला बोहोल्यावर!

मनीष पांडे याच्यानंतर भारताचा क्रिकेटपटू सिद्धेश लाड हा शनिवारी बोहोल्यावर चढला... सिद्धेश हा मुंबईचा खेळाडू आहे. त्यानं नऊ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर प्रेयसी हीर्ली खत्रीसह विवाह केला.

2019च्या आयपीएल मोसमात सिद्धेश हा मुंबई इंडियन्सचा सदस्य होता. पण, आयपीएल ट्रेड विंडोत त्याला KKRनं आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.

सिद्धेश 2015च्या मोसमापासून मुंबई इंडियन्ससोबत होता. पण, त्याला 2019मध्ये या संघाकडून पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली.

रोहित शर्मा जायबंदी झाल्यानंतर सिद्धेशला ही संधी मिळाली. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्यानं 13 चेंडूंत 15 धावा केल्या होत्या.

10 जूनला सिद्धेश आणि हीर्ली यांचा साखरपूडा झाला होता.

लग्नासाठी सिद्धेशनं 9 तारखेपासून सुरु होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातून माघार घेतली आहे.

सिद्धेशनं 54 प्रथम श्रेणी सामन्यांत 43.15च्या सरासरीनं 3884 धावा केल्या आहेत आणि त्यात 8 शतकं व 25 अर्धशतकांचा समावेश आहे.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यानं 38 सामन्यांत 1124 धावा आहेत, तर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 44 सामन्यांत 703 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एकूण 31 विकेट्स आहेत.

सिद्धेशच्या लग्नाचे पहिला फोटो इंडियन प्रीमिअर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्स संघानं प्रथम सोशल मीडियावर अपलोड केली.