विराट कोहलीनं खरेदी केलेल्या दहा महागड्या गोष्टी; एकेकाची किंमत वाचून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 12:40 PM2021-06-15T12:40:32+5:302021-06-15T12:43:21+5:30

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. सोशल मीडियावरील कमाईच्या बाबतीत त्यानं टॉप शंभरमध्ये एकमेव क्रिकेटपटूचे स्थान पटकावले आहे. शिवाय बीसीसीआयकडून मिळणाऱ्या 7 कोटी पगाराच्या कित्तेक पटीनं तो ब्रँड्समधून कमावतो. सूत्रांच्या माहितीनुसार ब्रँड्समधून त्याची कमाई ही जवळपास 200 कोटींच्या घरात आहे. आता इतके पैसे कमावणारा विराट कोहली स्वस्थ गोष्टींचा शौक ठेवेल का? 10 Most expensive assets owned by Virat Kohli

रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू संघाचा कर्णधार 87 लाखांचं Rolex Daytona घड्याळ वापरतो.

1.10 कोटींची Audi RS5 Coupe - भारताचा कर्णधार विराट हा ऑडी इंडियाचा सदिच्छादूत आहे. 32 वर्षीय कोहलीच्या कलेक्शनमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत. त्यात ऑडी RS5 Coupe या गाडीचाही समावेश आहे. 2018मध्ये या गाडीचं लाँचिंग विराटच्या हस्तेच करण्यात आलं होतं

Range Rover Land Rover Vogue - 2018मध्ये विराटच्या ताफ्यात SUV कुटुंबातील Range Rover Land Rover Vogue ही गाडी दाखल झाली. त्याची किंमत 2.7 कोटी इतकी आहे.

Bentley Flying Spur - 2019मध्ये विराट कोहलीनं फाईव्ह सीटर सेडान Bentley Flying Spur ही 3.97 कोटींची गाडी खरेदी केली.

Bentley Continental GT - Bentley कुटुंबातील आणखी एक गाडी विराटच्या ताफ्यात आहे आणि तिची किंमत ही 4.6 कोटी इतकी आहे.

FC Goa - इंडियन सुपर लीगमध्येही विराट कोहलीची गुंतवणूक आहे आणि FC Goa या क्लबचा तो मालक आहे. 33 कोटी ही त्या क्लबची किंमत आहे.

मुंबईतील घर - विराट व अनुष्का सध्या वरळी येथील ओमकार 1973 टॉवरमध्ये 35व्या मजल्यावर राहतात. त्यांच्या या फ्लॅटची किंमत 34 कोटींच्या घरात आहे.

गुरुग्राम येथे 80 कोटींचा बंगला

मुंबईतील वर्सोवा येथे 10 कोटींचा फ्लॅट - विराट कोहलीनं वर्सोवा येथी 3 BHK फ्लॅट खरेदी केला आहे आणि त्याची किंमत 10 कोटींच्या घरात आहे. सध्या विराट वरळी येथील घरात राहतोय.

Fashion Brand Wrogn - विराट कोहली Wrogn या फॅशन ब्रँडसाठी 13.2 कोटी रुपये खर्च करतो.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!