१२,७५,००० रुपयांचं पॅकेज आणि वेगळे इन्सेटिव्ह, नवी करप्रणाली निवडल्यास किती द्यावा लागेल टॅक्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 08:55 IST2025-02-05T08:51:08+5:302025-02-05T08:55:59+5:30
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सामान्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. नव्या कर प्रणालीनुसार १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलंय.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सामान्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. नव्या कर प्रणालीनुसार १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलंय.
तसेच टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. नव्या कर प्रणालीत पगारदारांना ७५ हजार रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन देखील मिळतं. तुमचा पगार कितीही असला तरी त्यात ही वजावट नक्कीच मिळेल.
स्टँडर्ड डिडक्शनसह १२ लाख ७५ हजार रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. पण समजा एखाद्या पगारदार व्यक्तीचं पॅकेज १२,७५,००० रुपये असेल, पण त्यालाही वर्षभरात १,००,००० रुपये इन्सेंटिव्ह मिळाले, तर कराची गणना कशाच्या आधारावर केली जाईल? त्याला किती कर भरावा लागेल? जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
० ते ४ लाखांवर ० टक्के कर, ४ ते ८ लाखांवर ५ टक्के कर, ८ ते १२ लाखांवर १० टक्के कर, १२ ते १६ लाखांवर १५ टक्के कर, १६ ते २० लाखांवर २० टक्के कर, २० ते २४ लाखांवर २४ लाखांवरील २५ टक्के कर आणि २४ लाखांपेक्षा अधिक रकमेवर ३० टक्के कर आकारला जाणार आहे.
जर तुमचं पॅकेज १२,७५,००० रुपये असेल आणि तुम्हाला १,००,००० रुपये इन्सेंटिव्ह मिळत असेल तर तुम्हाला स्लॅबनुसार इन्सेंटिव्हवर टॅक्स भरावा लागेल. हे मोजण्यासाठी तुमचं उत्पन्न आणि इन्सेंटिव्ह जोडलं जाईल. १२,७५,०००+१,००,००० = १३,७५,००० रुपये.
इन्कम टॅक्स स्लॅबनुसार तुम्ही १२ ते १६ लाखांच्या स्लॅबमध्ये असाल आणि त्यावर १५ टक्के कर आकारला जाईल. अशा तऱ्हेनं तुम्हाला तुमच्या इन्सेंटिव्ह वर १५ टक्के दरानं म्हणजेच १५,००० रुपयांचा कर भरावा लागेल.