परभणीचा महापौर कोण? १३ जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; ९ फेब्रुवारीला फैसला!

By राजन मगरुळकर | Updated: February 3, 2026 15:51 IST2026-02-03T15:50:42+5:302026-02-03T15:51:16+5:30

पक्षीय बलाबल पाहता महापौरपदासाठी उद्धव सेनेने सर्वाधिक ६ उमेदवारांचे अर्ज दाखल करून मोठे आव्हान उभे केले आहे.

Who is the mayor of Parbhani? 13 people are in the running on the last day of filing applications; Decision on February 9! | परभणीचा महापौर कोण? १३ जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; ९ फेब्रुवारीला फैसला!

परभणीचा महापौर कोण? १३ जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; ९ फेब्रुवारीला फैसला!

परभणी: परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून मंगळवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. दुपारी तीन वाजेपर्यंत महापौर पदासाठी एकूण १३, तर उपमहापौर पदासाठी ७ अर्ज दाखल झाले आहेत. पक्षीय बलाबल पाहता महापौरपदासाठी उद्धव सेनेने सर्वाधिक ६ उमेदवारांचे अर्ज दाखल करून मोठे आव्हान उभे केले आहे.

पक्षांतर्गत चढाओढ आणि माघारीचे राजकारण
महापौर पदासाठी उद्धव सेनेकडून ६, भाजपकडून ४, काँग्रेसकडून २ आणि राष्ट्रवादीकडून १ अर्ज दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, आज सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात एकत्रितपणे अर्ज दाखल केले. मात्र, ही शांतता केवळ ९ फेब्रुवारीपर्यंतच राहण्याची शक्यता आहे. अर्ज जास्त आल्याने आता पक्षश्रेष्ठींना कोणाची माघार घ्यायची आणि कोणाचा 'राजकीय बळी' द्यायचा, यासाठी कसरत करावी लागणार आहे.

उपमहापौर पदासाठीही मोठी चुरस
उपमहापौर पदासाठी ७ अर्ज आले असून यात काँग्रेसने ३ अर्ज दाखल करत या पदावर आपला हक्क सांगितला आहे. याशिवाय भाजप २, उद्धव सेना १ आणि राष्ट्रवादी १ असे अर्ज दाखल झाले आहेत. येत्या ९ फेब्रुवारीला महापालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली असून, याच सभेत परभणीचा नवा कारभारी कोण, हे स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, माघारीच्या दिवशी होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title : परभणी महापौर चुनाव: 13 नामांकन दाखिल, 9 फरवरी को फैसला!

Web Summary : परभणी महापौर चुनाव में 13 नामांकन दाखिल हुए, उद्धव सेना सबसे आगे। उपमहापौर के लिए भी कड़ी प्रतिस्पर्धा। फैसला 9 फरवरी को। तब तक राजनीतिक जोड़-तोड़ की संभावना।

Web Title : Parbhani Mayor Race Heats Up: 13 Nominations Filed, Decision on February 9

Web Summary : Parbhani's mayoral election sees 13 nominations filed, with Uddhav Sena leading. Intense competition for Deputy Mayor too. Decision on February 9th. Political maneuvering expected before then.