बीपीचे औषध समजून घेतले उंदीर मारण्याचे विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 10:16 IST2023-04-08T10:15:52+5:302023-04-08T10:16:20+5:30

२८ वर्षीय तरूणीचा मृत्यू, सेलू मधील घटना

A rat poison known as a BP drug | बीपीचे औषध समजून घेतले उंदीर मारण्याचे विष

बीपीचे औषध समजून घेतले उंदीर मारण्याचे विष

लोकमत न्यूज नेटवर्क, सेलू (जि. परभणी) : उच्च रक्तदाबावर नियमितपणे औषध घेणाऱ्या महिलेने नजरचुकीने उंदीर मारण्याचे विषारी औषध घेतले.  त्यानंतर त्यांना तत्काळ परभणीतील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. प्रियंका संतोष टेकाळे (रा. वालूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

वालूर येथे प्रियंका संतोष टेकाळे (२८) यांनी उच्च रक्तदाबाचे औषध समजून नजरचुकीने ४ एप्रिलला सायंकाळी त्यांनी उंदीर मारण्याचे औषध घेतले. काही वेळाने त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. पुढे परभणीतील खासगी रुग्णालयात, नंतर ५ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सेलू पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली.

Web Title: A rat poison known as a BP drug