महिला बचतगटातील महिलांना हलके मोटार वाहनाचे प्रशिक्षण दिले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 18:56 IST2024-01-08T18:56:22+5:302024-01-08T18:56:30+5:30
जसखार ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम !

महिला बचतगटातील महिलांना हलके मोटार वाहनाचे प्रशिक्षण दिले जाणार
उरण: महिला बचत गटातील महिलांना हलके मोटार वाहनाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम जसखार ग्रामपंचायतीनी हाती घेतला आहे. सोमवारी (८) रत्नेश्वरी देवीच्या मंदिराच्या प्रांगणात जसखार ग्रामपंचायतीच्या सरपंच काशीबाई ठाकूर यांच्या हस्ते प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली.तसेच मोटार ट्रेनिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना प्रशिक्षणासोबत रस्ता सुरक्षतेचे बाबतीत आरटीओचे नियम माहीत असावे म्हणून श्री. एकवीरा मोटार ट्रेनिंग स्कूलचे वतीने "वाहन चालन मार्गदर्शिका" पुस्तिका देण्यात आली.
सदरचे प्रशिक्षण देण्यासाठी ग्रामपंचायत जसखार यांनी श्री एकवीरा मोटार ट्रेनिंग स्कूल,उरण यांची निवड केली आहे.यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच काशिबाई ठाकुर,उपसरपंच प्रणाली जयवंत घरत, सदस्य आशुतोष म्हात्रे, सदस्या हेमलता ठाकूर,सीमा ठाकूर ग्रामसेवक रुपम गावंड, पंचायत समितीचे माजी सदस्य दिपक ठाकुर, श्री एकवीरा मोटार ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक बळीराम ठाकुर तसेच विविध महिला बचत गटांतील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.प्रिती दिपक ठाकुर यांच्या संकल्पनेतून सदरचा उपक्रम जसखार ग्रामपंचायत राबवित असल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.