चिरनेर येथील उद्योजकाच्या बंगल्यात साडेतीन फुट लांबीचा शिरला नाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 16:51 IST2022-10-05T16:49:49+5:302022-10-05T16:51:05+5:30

चिरनेर येथील उद्योजक राजेंद्र खारपाटील यांच्या बंगल्यात बुधवारी दुपारच्या सुमारास नाग शिरला.

Three and a half feet long snake in the bungalow of an entrepreneur in Chirner | चिरनेर येथील उद्योजकाच्या बंगल्यात साडेतीन फुट लांबीचा शिरला नाग

चिरनेर येथील उद्योजकाच्या बंगल्यात साडेतीन फुट लांबीचा शिरला नाग

मधुकर ठाकूर

उरण : भक्ष्याचा पाठलाग करताना चिरनेर येथील उद्योजक राजेंद्र खारपाटील यांच्या बंगल्यात घुसलेल्या साडेतीन फूट लांबीच्या नागाला सर्पमित्र राजेश पाटील यांनी शिताफीने पकडून जंगलात सोडून दिले.

चिरनेर येथील उद्योजक राजेंद्र खारपाटील यांच्या बंगल्यात बुधवारी दुपारच्या सुमारास नाग शिरला. बंगल्यात असलेल्या बगीच्यात हा नाग भक्षाचा पाठलाग करताना थेट बंगल्यात घुसला. बाग कामगारांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सर्पमित्रांना पाचारण केले.  फ्रेंड्स ऑफ व नेचर (फॉन) संस्थेचे सदस्य सर्पमित्र राजेश पाटील यांनी बंगल्यात जीन्या जवळील कपाटाखाली लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या साडेतीन फूट लांबीच्या नागाला  शिताफीने पकडले आणि जंगलात त्याच्या नैसर्गिक आवासात सोडून दिले.

Web Title: Three and a half feet long snake in the bungalow of an entrepreneur in Chirner

टॅग्स :uran-acउरण