श्री जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज सांप्रदायिकांकडून उरणमध्ये शोभायात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 19:02 IST2023-03-22T19:00:43+5:302023-03-22T19:02:02+5:30
श्री जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज सांप्रदायिकांकडून दरवर्षी हिन्दू नवं वर्ष आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यात शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते.

श्री जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज सांप्रदायिकांकडून उरणमध्ये शोभायात्रा
उरण : हिंदू नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून उरणमध्ये श्री. जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज सांप्रदायिकांकडून पारंपरिक संस्कृतीचे जतन करत भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
श्री जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज सांप्रदायिकांकडून दरवर्षी हिन्दू नवं वर्ष आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यात शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या शोभायात्रेचा मान हा उरण तालुक्यातील श्री जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज सांप्रदायिय सेवा केंद्राना प्राप्त झाला होता.त्यामुळे श्री जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज सांप्रदायिचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रमोद परदेशी तसेच उरण तालुका सेवा केंद्र अध्यक्ष रमाकांत बंडा यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील पुरुष महिला सांप्रदाय सदस्यांनी पारंपरिक वेशभूषा करून उरण कोट नाका, श्री राघोबा देव मंदिर, राजपाल नाका, आनंद नगर, कामठा, पेन्शन पार्क या ठिकाणावरून निघालेल्या शोभायात्रेच्या मिरवणूकीत मोठ्या संख्येने उत्साहात अनुयांयी सहभागी झाले होते.टाळ मृदंग वाजवत तसेच लेझीम पथका बरोबर ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत,नाचत शोभायात्रेच्या मिरवणूकीत मोठ्या उत्साहात आपला सहभाग घेतल्याने उरण नगरीत एक प्रकारे नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.