महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणारे पनवेल महानगरपालिकेचा पिंक बजेट; ३९९१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

By वैभव गायकर | Published: February 23, 2024 03:09 PM2024-02-23T15:09:31+5:302024-02-23T15:10:45+5:30

Panvel Municipal Corporation Budget: बाल्याअवस्थेत असलेली पनवेल महानगरपालिका हळू हळू कात टाकत आहे.सन 2023-24 चे सुधारित व 2024 -25 चे मुळ 3991 कोटी 99 लाखांचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांनी शुक्रवार दि.24 रोजी सादर केले.

Pink budget of Panvel Municipal Corporation which prioritizes women empowerment; budget of 3991 crores presented | महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणारे पनवेल महानगरपालिकेचा पिंक बजेट; ३९९१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणारे पनवेल महानगरपालिकेचा पिंक बजेट; ३९९१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

- वैभव गायकर
पनवेल - बाल्याअवस्थेत असलेली पनवेल महानगरपालिका हळू हळू कात टाकत आहे.सन 2023-24 चे सुधारित व 2024 -25 चे मुळ 3991 कोटी 99 लाखांचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांनी शुक्रवार दि.24 रोजी सादर केल.कोणतीही कर वाढ,दर वाढ नसलेल्या या अर्थसंकल्प महिला सशक्तीकरणावर भर देत.या अर्थसंकल्पाला गुलाबी(पिंक) बजेट नाव दिले आहे.याकरिता बजेटवचा मुखपृष्ठ गुलाबी रंगाचा देण्यात आला आहे.

 यंदाच्या 3991 कोटींच्या अर्थसंकल्पात 1258 कोटी आरंभीची शिल्लकिचा समावेश आहे.याव्यतिरिक्त मनपा कर 1411 कोटी युडीसीपीआर व विकास शुल्क अंतर्गत वसुली 101 कोटी,जीएसटी अनुदान 470 कोटी तसेच करेतर महसूल शास्ती व शुल्कचे 197 कोटींच्या जमेच्या बाजूंचा समावेश आहे.मात्र असे असले तरी पालिका क्षेत्रात सुरु असलेले मालमत्ता कराचा तिढा लक्षात घेता मनपा कराचे 1411 कोटीचा निधी वेळेत वसूल न झाल्यास अर्थसंकल्पाचा आकडा 2828 कोटींवर खाली सरकण्याची शक्यता आहे.असे असले तरी पालिकेची 1230 कोटींची ठेवी हि जमेची बाजू आहे.मागच्या पाच वर्षाच्या  तुलनेत ठेवींचा आकडा 190 वरून 1230 कोटी पर्यंत पोहचल्याने पनवेल महानगरपालिकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबुत होत आहे.

मात्र हा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महानगरपालिकेचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवल्याचे दिसून येत आहे.मागील वर्षीचा अर्थसंकल्प आरोग्यावर भर देणारा होता त्यादृष्टीने शहरात नव्याने 15 नागरी आरोग्य ,रात्री सुरु होणारे आपला दवाखाना या व्यतिरिक्त कळंबोली याठिकाणी कार्यान्वित होत असलेले 72 बेडेड हॉस्पिटल तसेच माता बाळ रुग्णालयाची उभारणी अंतिम टप्प्यात आहे.   

Web Title: Pink budget of Panvel Municipal Corporation which prioritizes women empowerment; budget of 3991 crores presented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.