कामोठ्यात १७ लाखांची रोकड पकडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 07:46 IST2026-01-07T07:46:00+5:302026-01-07T07:46:00+5:30
दहा लाखांपेक्षा जास्त रोकड निवडणूक काळात सोबत बाळगता येत नाही.

कामोठ्यात १७ लाखांची रोकड पकडली
लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल : निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने पालिका हद्दीत विविध ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकांमार्फत वाहनांची तपासणी सुरू आहे. सोमवारी मध्यरात्री कामोठ्यात एका वाहनात तब्बल १७ लाखांची रोकड या स्थिर पथकाच्या हाती लागली आहे. सद्यस्थितीत ही रक्कम महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे यांच्या मार्गदर्शनात ट्रेझरीमध्ये ठेवण्यात आली आहे.
दहा लाखांपेक्षा जास्त रोकड निवडणूक काळात सोबत बाळगता येत नाही. योग्य कारण न दिल्यास ही रक्कम जप्त करून शासनदरबारी जमा केली जाते. संबंधित रक्कम १० लाखांच्या वर असल्याने आयकर विभागाला याबाबत माहिती दिली आहे. आयकर विभागाकडून याबाबत योग्य ती चौकशी करून ती संबंधिताला परत देण्यात येईल, अशी माहिती आचारसंहिता प्रमुख महेशकुमार मेघमाळे यांनी दिली. तसेच ९ लाख ३१ हजारांची ३१९ लीटर दारूही जप्त केल्याची माहिती मेघमाळे यांनी दिली.