दारूसाठी पैसे न दिल्याने एकावर वार, ऐरोलीतील घटना 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 13, 2023 18:46 IST2023-03-13T18:46:00+5:302023-03-13T18:46:27+5:30

ऐरोलीत दारूसाठी पैसे न दिल्याने एकावर वार करण्यात आला. 

 One was stabbed for not paying for liquor in Airoli  | दारूसाठी पैसे न दिल्याने एकावर वार, ऐरोलीतील घटना 

दारूसाठी पैसे न दिल्याने एकावर वार, ऐरोलीतील घटना 

नवी मुंबई : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकावर चाकूने वार झाल्याची घटना समोर आली आहे. रंगपंचमीच्या रात्री हा प्रकार घडला असून जखमी तरुणाने सोमवारी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार एकावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

विटावा येथे राहणाऱ्या मनोज मालुसरे याच्यासोबत ऐरोलीतल्या पटनी लगतच्या भागात हा प्रकार घडला आहे. विटावा परिसरात राहणारा साहिल हा मनोजच्या तोंडओळखीचा आहे. साहिल हा व्यसनी असून त्याला गांजाचे देखील व्यसन आहे. यातून त्याने काही दिवसांपूर्वी मनोजकडे व्यसनासाठी पैसे मागितले होते. परंतु मनोजने पैसे नसल्याचे सांगून त्याला देण्यास नकार दिला होता. 

यावेळी त्याने बघून घेण्याची धमकी दिली होती. रंगपंचीमीच्या दिवशी साहिल हा मनोज सोबत रंग खेळल्यानंतर काही कामानिमित्त त्याला पटनी मैदानालगत घेऊन आला. त्याठिकाणी त्याने दारूसाठी पैसे दिले नाहीत याचा राग व्यक्त करत धारधार शस्त्राने पोटावर वार करून पळ काढला. यामध्ये जखमी झालेला मनोज हा जखमी अवस्थेत घरी आला असता बेशुद्ध पडला होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारानंतर प्रकृती ठिक झाल्याने सोमवारी त्याने याप्रकरणात रबाळे पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस साहिलचा शोध घेत आहेत. 


 

Web Title:  One was stabbed for not paying for liquor in Airoli 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.