लाडक्या बहिणींच्या मुद्द्याला आता बचत गटांनी उत्तरे द्या; रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; सभेला मंदा म्हात्रे यांची दांडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:31 IST2026-01-03T12:31:12+5:302026-01-03T12:31:29+5:30
कार्यकर्त्यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेल्या आमदार मंदा म्हात्रे व्यासपीठावर नसल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी खासदार संजीव नाईक व सर्व उमेदवार उपस्थित होते.

लाडक्या बहिणींच्या मुद्द्याला आता बचत गटांनी उत्तरे द्या; रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; सभेला मंदा म्हात्रे यांची दांडी
नवी मुंबई : विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जा. समोरच्यांकडे (शिंदेसेनेचे नाव न घेता) लाडकी बहीण हा एकच मुद्दा आहे. तुम्ही महिला बचत गट एकत्र करा, त्यांना विश्वासात घ्या, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवी मुंबईत पक्षाचा प्रचाराचा नारळ फोडताना केले आहे. पुढील काळात आरोप-प्रत्यारोप होतील, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला. मात्र, प्रचाराच्या मुहूर्तालाच आमदार मंदा म्हात्रे उपस्थित नसल्यामुळे भाजपमधील गटबाजी उघड झाली आहे.
समाेरच्यांकडे विकासाच्या मुद्द्याचा व पण नाही. त्यांच्याकडे फक्त लाडक्या बहिणीचा मुद्दा आहे, विरोधकांकडे सत्ता गेली तर भ्रष्टाचार वाढेल, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले. शिंदेसेनेतील रामदास पवळे, ऋचा पाटील या पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.