शिंदेसेनेच्या माजी नगरसेविका भाजपामध्ये, भाजपामध्येही फूट पदाधिकारी शिंदेसेनेत, भाजपमधील मंदा म्हात्रे गट नाराज
By नामदेव मोरे | Updated: December 30, 2025 13:31 IST2025-12-30T13:26:11+5:302025-12-30T13:31:07+5:30
Navi Mumbai Municipal Corporation Election: निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे सेनेतील माजी उपमहापौर अशोक गावडे, माजी नगरसेवीका ॲड. सपना गावडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपामधील काही पदाधिकाऱ्यांनीही इतर पक्षात प्रवेश केला आहे.

शिंदेसेनेच्या माजी नगरसेविका भाजपामध्ये, भाजपामध्येही फूट पदाधिकारी शिंदेसेनेत, भाजपमधील मंदा म्हात्रे गट नाराज
नवी मुंबई - निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे सेनेतील माजी उपमहापौर अशोक गावडे, माजी नगरसेवीका ॲड. सपना गावडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपामधील काही पदाधिकाऱ्यांनीही इतर पक्षात प्रवेश केला आहे.
नवी मुंबईमध्ये शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिंदे सेनेतून उमदेवारी निश्चीत असलेल्या माजी नगरसेवीका ॲड. सपना गावडे यांनी अचानक भाजपामध्ये प्रवेश केला आहे. हा शिंदेसेनेला धक्का समजला जात आहे. भाजपाचे महामंत्री व युवा मोर्चोचे जिल्हा अध्यक्ष दत्ता घंगाळे यांनाही तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. नेरूळ गावामधून उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या देवनाथ म्हात्रे यांनीही राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये उमदेवारीवरून आमदार मंदा म्हात्रे यांचा गट नाराज झाला आहे. अनेकांनी बंडखोरी करण्यास सुरुवात केली आहे.