नवी मुंबईत ११७ अर्ज बाद, ७०० अर्ज वैध; नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्ज माघारी घेण्यासाठी मनधरणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:31 IST2026-01-01T14:30:54+5:302026-01-01T14:31:05+5:30
नवी मुंबईमध्ये २८ प्रभागांमधील १११ जागांसाठी ९५६ अर्ज दाखल झाले होते.

नवी मुंबईत ११७ अर्ज बाद, ७०० अर्ज वैध; नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्ज माघारी घेण्यासाठी मनधरणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : निवडणूक अर्जाच्या छाननीमध्ये शहरात ११७ अर्ज बाद झाले आहेत तर ८३९ अर्ज वैध ठरले आहेत. शिंदेसेना व उद्धवसेनेचे प्रत्येकी ३ अर्ज बाद झाले आहेत. अपक्षांचे व डमी अर्जही बाद झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २ जानेवारीपर्यंतची मुदत असल्यामुळे बंडखोरांची मनधरणीसाठी कसब पणाला लागणार आहे.
नवी मुंबईमध्ये २८ प्रभागांमधील १११ जागांसाठी ९५६ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी सर्व उमेदवारांना बोलावून प्रभागनिहाय कागदपत्रांची छाननी केली. यात शिंदेसेनेचे तीन अर्ज बाद झाले. दोन ठिकाणी सूचक व अनुमोदक यांचे नाव नव्हते. एका ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे अर्ज बाद झाला. उद्धवसेनेचेही ३ ठिकाणी अर्ज बाद झाले. त्यापैकी दोन ठिकाणी सही नसल्यामुळे व एका ठिकाणी पक्षानेच अर्ज बाद केल्याची घटना घडली आहे.
ऐरोली, घणसोली, दिघा परिसरात अनधिकृत बांधकाम व करभरणा न करणे व इतर काही आक्षेप घेण्यात आले होते. अनेक उमेदवारांनी एबी फॉर्म नसताना पक्षाच्या नावाने अर्ज भरले होते. अशाप्रकारे सादर झालेले सर्व अर्ज बाद करण्यात आले.
विभागनिहाय वैध व अवैध अर्जाचा तपशील
विभाग
वैध
अवैध
बेलापूर
१२७
९
नेरूळ
१३४
२८
तुर्भे
१३१
१४
घणसोली
७४
३९
ऐरोली
८३
६
दिघा
८४
२
कोपरखैरणे
१०५
१८
वाशी
१०१
१९६१
ऐरोली, दिघा येथे संघर्षाची चर्चा
दोन विभागांमध्ये शिंदेसेना व भाजपच्या काही उमेदवारांनी एकमेकांच्या अर्जावर आक्षेप घेतले होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची चर्चा होती. छाननी केंद्रात वाद झाल्याचे काही सांगत होते तर काही केंद्राच्या बाहेर वाद झाल्याची चर्चा होती. परंतु, कोणत्याही संघर्षाची तक्रार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सर्व केंद्रांबाहेर कडक बंदोबस्त
छाननीवेळी आठही केंद्रांच्या बाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊ नये, यासाठी सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवले होते.
निवडणुकीसाठी २९१७ अर्जाचे वितरण झाले होते. यापैकी ९५६ जणांनी अर्ज भरले. १९६१ अर्जाची खरेदी झाली असली, तरी ते भरले गेले नाहीत. अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज खरेदी केले होते तर काहींनी अर्ज घेतले पण ते भरलेच नाहीत.
अनेकांनी अर्ज खरेदी केले मात्र, दाखल केलेच नाही