निष्काळजीपणा करणारांना मनपा आयुक्तांनी झापले, उमेदवारांसह निवडणूक प्रतिनिधींनाही केल्या सूचना
By नामदेव मोरे | Updated: January 15, 2026 14:01 IST2026-01-15T14:00:59+5:302026-01-15T14:01:20+5:30
महानगर पालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेट दिली. निष्काळजीपणा करणा-या कर्मचा-यांना झापले. जबाबदारी निश्चित करून दिलेल्या ठिकाणी सर्वांनी थांबलेच पाहिजे असे सांगितले. उमेदवारांनीही नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.

निष्काळजीपणा करणारांना मनपा आयुक्तांनी झापले, उमेदवारांसह निवडणूक प्रतिनिधींनाही केल्या सूचना
नवी मुंबई - महानगर पालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेट दिली. निष्काळजीपणा करणा-या कर्मचा-यांना झापले. जबाबदारी निश्चित करून दिलेल्या ठिकाणी सर्वांनी थांबलेच पाहिजे असे सांगितले. उमेदवारांनीही नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
नवी मुंबईतील नेरूळसह विविध ठिकाणच्या केंद्रांना आयुक्तांनी प्रत्यक्षात भेट दिली. नेरूळमधील तेरणा महाविद्यालयातील केंद्रात गेटवर काही कर्मचारी व सुरक्षा रक्षक आढळले नाहीत. त्यांची झाडाझडती घेतली. कोणीही कर्तव्यात कसूर करू नये. निष्काळजीपणा केल्यास कारवाई चा इशारा दिला. मतदारांची गैरसोय होऊ नये अशा सूचना दिल्या. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी सर्वांनी जबाबदारीचे पालन करावे अशा सूचना यावेळी केल्या.