Video : उरणमध्ये गोडावूनला आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 23:46 IST2019-09-02T23:45:25+5:302019-09-02T23:46:17+5:30
आगीचे वृत्त समजताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.

Video : उरणमध्ये गोडावूनला आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
उरण - भेंडखळ-उरण येथील बामर लॉरी गोदामातील भरलेल्या कंटेनरमधील कपड्याला सोमवारी रात्री अचानक आग लागली. याआगीत कंटेनरमधील माल जळून खाक होऊन लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
आगीचे वृत्त समजताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर, तास-दीड तासात अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याची शक्यता उरण वपोनि जगदिश कुलकर्णी यांनी वर्तवली आहे.