चिरनेरमधील कंटेनरच्या गोदामात आढळला नऊ फुट लांबीचा अजगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 13:47 IST2023-10-15T13:45:41+5:302023-10-15T13:47:07+5:30
त्यासोबत तिथे उपस्थित असलेल्या कामगारांनाही सापाची माहिती दिली.

चिरनेरमधील कंटेनरच्या गोदामात आढळला नऊ फुट लांबीचा अजगर
मधुकर ठाकूर
उरण : चिरनेरच्या खारपाटील वेअर हाऊस मधील भोमालगत असलेल्या अगरवाल कंपनीच्या आवारात नऊ फुटाचा अजगर आढळून आला होता. तेथील कर्मचाऱ्यांनी फॉन संस्थेच्या हेल्पलाईन वर कॉल केला असता संस्थेचे सर्पमित्र राजेश पाटील त्या ठिकाणी जाऊन त्या अजगराचा रेस्क्यू केले. त्यासोबत तिथे उपस्थित असलेल्या कामगारांनाही सापाची माहिती दिली.
दिवसेंदिवस कमी होत चाललेली जंगले व त्यामुळे धोक्यात आलेले वन्यजीव नागरी वस्तीत दिसू लागले आहेत.असा कुठला जीव आपल्या घराच्या परिसरात दिसला तर त्याला न मारता संस्थेच्या हेल्पलाईन वर कॉल करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करा असे आवाहन सर्पमित्र राजेश पाटील यांनी केले.