जेएनपीटी कंत्राटी कामगारांच्या वेतन कराराची ३० महिन्यांची थकबाकी लवकर द्यावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 21:06 IST2023-06-06T21:06:12+5:302023-06-06T21:06:31+5:30
उरण : देशातील बंदर कामगारांचा थांबलेला वेतन करार लवकरात - लवकर करण्यात यावा तसेच जेएनपीटी कंत्राटी कामगारांच्या वेतन कराराची ...

जेएनपीटी कंत्राटी कामगारांच्या वेतन कराराची ३० महिन्यांची थकबाकी लवकर द्यावी
उरण : देशातील बंदर कामगारांचा थांबलेला वेतन करार लवकरात - लवकर करण्यात यावा तसेच जेएनपीटी कंत्राटी कामगारांच्या वेतन कराराची ३० महिन्यांची थकबाकी लवकर द्यावी अशी मागणी भारतीय मजूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय नौकानयन मंत्री श्रीपत नाईक यांची भेट घेऊन केली आहे.
भारतीय मजूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील आणि गोवा प्रदेशचे महामंत्री के. प्रकाश, रायगड जिल्हा बीएमस उपाध्यक्ष मधुकर पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी नुकतीच केंद्रीय नौकानयन मंत्री श्रीपत नाईक यांची गोवा निवासस्थानी भेट घेतली.या भेटीत देशातील विविध पोर्ट कामगारांविषयीच्या व कॉन्ट्रॅक्ट वर्कर तसेच विविध समस्या व प्रश्नावरती चर्चा करण्यात आली व त्यांना निवेदन देण्यात आले.
देशातील बंदर कामगारांचा थांबलेला वेतन करार लवकरात - लवकर करावा तसेच जेएनपीटी कंत्राटी कामगारांच्या वेतन कराराची ३० महिन्याची थकबाकी लवकर द्यावी अशी मागणी केंद्रीय नौकानयन मंत्री श्रीपत नाईक यांच्या गोवा येथील निवासस्थानी विविध पोर्ट कामगारांविषयीच्या व कॉन्ट्रॅक्ट वर्कर तसेच विविध समस्या व प्रश्नावरती चर्चा करण्यात आली व त्यांना निवेदन देण्यात आले.