तामिळनाडू सरकारने अर्थसंकल्पामधून हटवलं ₹ चिन्ह, भाषा वादादरम्यान उचललं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 15:10 IST2025-03-13T15:04:38+5:302025-03-13T15:10:01+5:30

Tamil Nadu News: भाषा वादादरम्यान तामिळनाडू सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे.  तामिळनाडूमधील स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने  राज्याच्या अर्थसंकल्पामधून '₹' चिन्ह हटवलं आहे. तसेच त्या चिन्हाची जागा 'ரூ' या चिन्हाने घेतली.

Tamil Nadu government removes ₹ symbol from budget, a big step taken amid language controversy | तामिळनाडू सरकारने अर्थसंकल्पामधून हटवलं ₹ चिन्ह, भाषा वादादरम्यान उचललं मोठं पाऊल

तामिळनाडू सरकारने अर्थसंकल्पामधून हटवलं ₹ चिन्ह, भाषा वादादरम्यान उचललं मोठं पाऊल

भारताचं चलन असलेल्या रुपयाचं अधिकृत चिन्ह म्हणून  '₹' चिन्हाचा वापर आता सर्रासपणे केला जातो. भारत सरकारनेही  '₹'  हे चिन्ह भारतीय रुपयाचं अधिकृत चिन्ह म्हणून स्वीकारून आता जवळपास १५ वर्षे होत आली आहेत. मात्र आता सध्या तामिळनाडूमद्ये सुरू असलेल्या भाषा वादादरम्यान तामिळनाडू सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे.  तामिळनाडूमधील स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने  राज्याच्या अर्थसंकल्पामधून '₹' चिन्ह हटवलं आहे. तसेच त्या चिन्हाची जागा 'ரூ' या चिन्हाने घेतली.

देशामध्ये  देशभरात '₹' चिन्ह अर्थसंकल्पाचं अधिकृत प्रतिक आहे. मात्र तामिळनाडू सरकारने तेही बदलून टाकलं आहे. ₹ या चिन्हाच्या जागी ज्या  ரூ चिन्हाची जागा घेण्यात आली आहे, ते तामीळ लिपीमधील रु अक्षर आहे. तसेच कुठल्याही राज्याने '₹' चिन्ह बदलून त्याजागी आपलं चिन्ह देण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा सूत्राद्वारे हिंदी भाषा लादण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करत स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्याशिवाय २०२६ साली होणाऱ्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेलाही स्टॅलिन यांनी विरोध केला होता. 

Web Title: Tamil Nadu government removes ₹ symbol from budget, a big step taken amid language controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.