निवडणूक आयोगाने निर्मला सीतारामन यांचे हात बांधले; अर्थसंकल्पात दिल्ली केंद्रीत घोषणा नको, पत्र लिहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:52 IST2025-01-07T15:51:27+5:302025-01-07T15:52:02+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीच घोषणा झाली आहे. फेब्रुवारीच्या ५ तारखेला मतदान होणार आहे. तर ८ तारखेला निकाल जाहीर केला जाणार ...

Election Commission ties Nirmala Sitharaman's hands; Don't want Delhi-centric announcements in the budget, wrote a letter | निवडणूक आयोगाने निर्मला सीतारामन यांचे हात बांधले; अर्थसंकल्पात दिल्ली केंद्रीत घोषणा नको, पत्र लिहिले

निवडणूक आयोगाने निर्मला सीतारामन यांचे हात बांधले; अर्थसंकल्पात दिल्ली केंद्रीत घोषणा नको, पत्र लिहिले

दिल्ली विधानसभा निवडणुकीच घोषणा झाली आहे. फेब्रुवारीच्या ५ तारखेला मतदान होणार आहे. तर ८ तारखेला निकाल जाहीर केला जाणार आहे. दिल्ली निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना म्हणजे १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प देखील सादर होणार आहे. यावर निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला दिल्ली निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत सूचना केली आहे.

देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मांडणार आहेत. नेहमीच्या बजेटप्रमाणे दिल्ली राज्यासाठी काही घोषणा देखील या अर्थसंकल्पात असणार आहेत. परंतू, अशी तरतूद किंवा योजनेची घोषणा सीतारामन करू शकणार नाहीत. निवडणूक आयोगाने तसे पत्र केंद्र सरकारला पाठविले आहे. 

दिल्लीत निवडणूक असल्याने दिल्ली केंद्रीत कोणतीही घोषणा, तरतूद केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नसावी असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. 

दिल्लीत निवडणूक कधी....
दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. यावेळीही दिल्लीची निवडणूक एकाच टप्प्यात पूर्ण होणार आहे. विधानसभेच्या सर्व 70 जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. जवळपास १.५५ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महिलांबद्दल असभ्य भाषा वापरू नका. निवडणूक प्रचारात भाषेची काळजी घ्या, असा सल्ला निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना, नेत्यांना दिला आहे. 
 

Web Title: Election Commission ties Nirmala Sitharaman's hands; Don't want Delhi-centric announcements in the budget, wrote a letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.