Yashwant Barve honored with Lifetime Achievement Award | यशवंत बर्वे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

डॉ. बर्वे

ठळक मुद्देभविष्यातील शैक्षणिक धोरणाबद्दल मार्गदर्शन व दिशादर्शनाचे भरीव कार्य

नांदगाव : मानवधन संस्थेतर्फे कर्मयोगी डॉ. यशवंत बर्वे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
अतिदुर्गम आदिवासी, दुष्काळी भागात जाऊन विनामूल्य आरोग्यसेवा देणे, अन्नदान करणे, आर्थिक मदत करणे या माध्यमातून बर्वे यांनी समाजातील तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला. तसेच आदिवासी बांधवांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले. शैक्षणिक क्षेत्रात होत असणार्‍या बदलांचा पाठपुरावा करून, भविष्यातील शैक्षणिक धोरणाबद्दल मार्गदर्शन व दिशादर्शनाचे भरीव कार्य बर्वे यांनी केले आहे.
९१ वर्षीय डॉ. बर्वे यांना महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे अशा थोर देशभक्तांचा सहवास लाभला आहे.
मानवधन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे व सचिव ज्योती कोल्हे यांच्या हस्ते डॉ. यशवंत बर्वे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी डॉ. विजय बर्वे, अश्विनीकुमार भारद्वाज, डॉ. मृणाल भारद्वाज, माधुरी माटे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, डॉ. अंजली बर्वे, डॉ. अनिल बर्वे, हेमलता बीडकर, अनिल कोल्हे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Yashwant Barve honored with Lifetime Achievement Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.