ब्राह्मणवाडे येथे जलसाक्षरता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:44 IST2020-10-12T23:36:52+5:302020-10-13T01:44:00+5:30
नायगाव - सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे युवा मित्र व पाणी वापर संस्थेच्या वतीने आर्थिक व जलसाक्षरता अभियान योजनेबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले.

ब्राह्मणवाडे येथे जलसाक्षरता अभियान
नायगाव - सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे युवा मित्र व पाणी वापर संस्थेच्या वतीने आर्थिक व जलसाक्षरता अभियान योजनेबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात समाजातील सर्वच लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.त्यातच लॉकडाऊन काळात शेतमाल विक्री न झाल्यामुळे पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा फटका त्यांच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे..ही परिस्थिती लक्षात घेता युवा मित्र च्या कायर्कारी संचालिका मनीषा पोटे यांच्या मार्गदशर्नाखाली सिन्नर तालुका समन्वयक प्रितम लोणारे यांनी ब्राम्हणवाडे गावात पाणी वापर संस्थेच्या मदतीने गावातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक व जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले आहे. गावातील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांची मुद्देसूद माहिती लोणारे यांनी दिली.तसेच त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या. यावेळी शासनाच्या गाळ मुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेसाठीचा इंधन खर्च जरी बंद झालेला असला तरी युवा मित्र व टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत पोकलेन मशीन उपलब्ध करून देणार आहे.त्यासाठी लागणारे इंधन लोकसहभागातून टाकायचे आहे व गाळाची वाहतूक स्वत: करायची आहे.मशिन उपलब्ध करण्यासाठी युवा मित्रच्या नावे मागणी पत्र द्यावे लागेल असे लोणारे यांनी सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी आण्णासाहेब गागरे यांच्या मार्गदशर्नाखाली कृषी सहाय्यक सुधीर सुयर्वंशी यांनी कृषी विभागाच्या योजनांबद्दलची सविस्तर माहिती दिली व शेतकºयांच्या अडचणींचे निरसन केले. यावेळी कैलास गिते, पुंडलिक वाघ,नवनाथ गामने यांच्या सोबत संदीप गिते, घारु गिते, शंकर गामने,निवृत्ती गिते,कचेश्वर गिते,दिगंबर गिते,विलास गिते उपस्थित होते.