नियम भंग करणाऱ्यांची येवल्यात तीन दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 01:12 IST2021-03-25T23:21:41+5:302021-03-26T01:12:16+5:30
येवला : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने शहरातील तीन दुकाने ३१ मार्चपर्यत सील करण्यात आली आहेत. तहसीलदार प्रमोद हिले हे महसूल विभागाच्या पथकासह शहरात पाहणी करत असताना नियमांची पायमल्ली करणाऱ्या जब्रेश्वर खुंट येथील पुष्कराज ज्वेलर्स, बाजारपेठेतील अथर्व गिफ्ट हाऊस व विंचूर चौफुली येथील न्यू तृप्ती फरसाण या दुकानांवर सीलबंदची कारवाई करण्यात आली.

नियम भंग करणाऱ्यांची येवल्यात तीन दुकाने सील
ठळक मुद्देवाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रशासन ॲक्शन मोडवर
येवला : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने शहरातील तीन दुकाने ३१ मार्चपर्यत सील करण्यात आली आहेत. तहसीलदार प्रमोद हिले हे महसूल विभागाच्या पथकासह शहरात पाहणी करत असताना नियमांची पायमल्ली करणाऱ्या जब्रेश्वर खुंट येथील पुष्कराज ज्वेलर्स, बाजारपेठेतील अथर्व गिफ्ट हाऊस व विंचूर चौफुली येथील न्यू तृप्ती फरसाण या दुकानांवर सीलबंदची कारवाई करण्यात आली. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी उपस्थित होते. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.