अडसरे बुद्रुक येथे आदिवासी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:20 IST2020-08-10T22:47:44+5:302020-08-11T01:20:26+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अडसरे बुद्रुक व टाकेद खुर्द येथे जागतिक आदिवासी दिन व क्र ांतिदिन साजरा करण्यात आला.

अडसरे बुद्रुक येथे आदिवासी दिन
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अडसरे बुद्रुक व टाकेद खुर्द येथे जागतिक आदिवासी दिन व क्र ांतिदिन साजरा करण्यात आला. अडसरे येथे
क्र ांतिवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्यास सरपंच संतू नारायण साबळे व माजी सरपंच संतोष साबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सागर साबळे, सुनील भवारी, शिवाजी तातळे, दत्तू आंबेकर, भरत साबळे, बाळू मुठे आदी उपस्थित होते.
टाकेद खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात क्र ांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सरपंच सचिन बांबळे व उपसरपंच कुसुम पांडे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बहिरू लगड, कैलास पांडे, ग्रामपंचायत सदस्य आरती लगड, हरी जोशी, भरत मुकणे आदी उपस्थित होते.