प्रलंबित मागण्याबाबत आदिवासी सेनेचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 00:22 IST2021-05-23T21:12:59+5:302021-05-24T00:22:42+5:30
इगतपुरी : शहरातील नाले, रस्त्यांची स्वच्छता व बकाल झालेल्या शासकीय इमारती, झोपडपट्ट्या, वसाहती कायम करणे आदी प्रलंबित मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने उपनगराध्यक्ष नईम खान व अधीक्षक एम. एन. सोनार यांना शुक्रवारी (दि.२१) देण्यात आले.

अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने नईम खान यांना निवेदन देताना दि. ना. उघाडेंसह कार्यकर्ते.
इगतपुरी : शहरातील नाले, रस्त्यांची स्वच्छता व बकाल झालेल्या शासकीय इमारती, झोपडपट्ट्या, वसाहती कायम करणे आदी प्रलंबित मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने उपनगराध्यक्ष नईम खान व अधीक्षक एम. एन. सोनार यांना शुक्रवारी (दि.२१) देण्यात आले.
नगर परिषदेच्या अकार्यक्षम कारभारामुळे शहरातील अनेक भागांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पाणीपुरवठा पाइपलाइन खोदकामामुळे शहरातील सर्व रस्ते खोदून शहराचे बकालीकरण झाले आहे. समाजमंदिरात अवैधधंदे आणि राजरोस मद्यपी बसत असून, यावर कोणाचाही अंकुश नाही. शहरातील सर्व रस्त्यांवर खड्डे पडले असून तेथून चालणेदेखील कठीण झाले आहे. याबाबत अनेकदा तक्रार करून ही प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे, पंडित गांगुर्डे, राजू गवळी, नितीन मोरे, विशाल गायकवाड, रूपेश जोशी, नितीन वालझाडे, अनुसयाबाई आगीवले, सागर जाधव, सोमा आगीवले, छाया गवळी आदी उपस्थित होते.