मोहाडी येथील श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रम रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:25 IST2020-08-10T22:55:10+5:302020-08-11T01:25:21+5:30

मोहाडी : येथील श्री अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिरात मंगळवारी (दि. ११) होणारा श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा व बुधवारी (दि. १२) गोपालकाल्यानिमित्त कीर्तन कार्यक्रम कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट मंदिर प्रशासनाने दिली आहे.

Shrikrushna Janmotsav program at Mohadi canceled | मोहाडी येथील श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रम रद्द

मोहाडी येथील श्रीकृष्ण जन्मोत्सव कार्यक्रम रद्द

ठळक मुद्देमंदिर प्रशासन स्थानिक स्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन

मोहाडी : येथील श्री अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिरात मंगळवारी (दि. ११) होणारा श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा व बुधवारी (दि. १२) गोपालकाल्यानिमित्त कीर्तन कार्यक्रम कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट मंदिर प्रशासनाने दिली आहे.
दरवर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्ण मंदिरात उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला जातो, तर दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकृष्ण मूर्तीला दुग्धाभिषेक पूजा, आरती, प्रसाद वाटप आदी कार्यक्रम संपन्न होत असतात. मात्र चालू वर्षी हे सर्व कार्यक्रम रद्द होणार असून, मंदिर प्रशासन स्थानिक स्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम जाधव व विश्वस्तानी दिली आहे.

Web Title: Shrikrushna Janmotsav program at Mohadi canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.