कनकापूरला धार्मिक कुटी जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:17 IST2020-03-08T00:15:38+5:302020-03-08T00:17:55+5:30
खर्डे : परिसरातील कनकापूर येथील भाऊसाहेब शिंदे यांच्या सोनशाम गो शाळेलगत धार्मिक विधीसाठी बनवलेली कुटी आगीच्या भक्षस्थानी पडल्याने खाक झाली.

कणकापूर येथील आगीत भस्मसात झालेली कुटी.
लोकमत न्यूज नेटवर्क
खर्डे : परिसरातील कनकापूर येथील भाऊसाहेब शिंदे यांच्या सोनशाम गो शाळेलगत धार्मिक विधीसाठी बनवलेली कुटी आगीच्या भक्षस्थानी पडल्याने खाक झाली.
तालुक्यातील कनकापूर येथील शांतिगिरी महाराजांचे शिष्य भाऊसाहेब शिंदे यांनी त्यांच्या घराजवळ गो शाळा बांधली असून त्यालगतच त्यांनी धार्मिक विधीसाठी कुटी बनवलेली आहे.
या कुटीत त्यांनी सकाळी पूजा केली . या कुटीला १० वाजता आग लागली . या आगीत कुटी भस्मसात झाली आहे . ही आग दिव्यामुळे लागल्याची माहिती शिंदे यांनी दिली. कुटीतील पेटत्या दिव्याची वात उंदराने ओढली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे . या कुटीत असलेल्या सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत . यात जवळपास ८० हजार रु पयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे.