इगतपुरी महाविद्यालयात रासेयो वर्धापनदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 16:12 IST2020-09-26T16:08:48+5:302020-09-26T16:12:46+5:30

घोटी : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्र माच्या सुरु वातीला प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Raseyo anniversary celebration at Igatpuri College | इगतपुरी महाविद्यालयात रासेयो वर्धापनदिन साजरा

राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन करताना प्राचार्य पी. आर. भाबड तसेच व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. देवीदास गिरी, रासेयो प्रमुख प्रा. बी. सी. पाटील, प्रा. के. के. चौरसिया, प्रा. एस. के. शेळके आदी.

ठळक मुद्देप्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

घोटी : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्र माच्या सुरु वातीला प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना नेहमीच कार्यतत्पर राहण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य प्रा. देवीदास गिरी यांनीही भनोगत व्यक्त केले.
कार्यक्र माचे प्रास्ताविक प्रा. बी. सी. पाटील यांनी केले. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी व उद्दिष्टे स्पष्ट केली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रा. एस. के. शेळके यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. के. के. चौरसिया यांनी केले. यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
 

 

 

 

Web Title: Raseyo anniversary celebration at Igatpuri College