राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 00:08 IST2021-02-15T00:06:08+5:302021-02-15T00:08:35+5:30

नाशिक : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व प्रशासकीय आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देत जनसेवा करणाऱ्या ११ जनसेवकांचा जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेतर्फे राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार वीरमाता सुषमा मांडवगणे व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Provide state level awareness awards | राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान

राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान

ठळक मुद्देसन्मान सोहळा : विविध क्षेत्रांतील जनसेवकांचा गौरव

नाशिक : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व प्रशासकीय आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देत जनसेवा करणाऱ्या ११ जनसेवकांचा जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेतर्फे राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार वीरमाता सुषमा मांडवगणे व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
परशुराम सायखेडकर नाट्यगृहात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शांता वाणी यांच्या अध्यक्षखाली रविवारी (दि.१४) ह्यजाणीव पुरस्कार २०१९-२० प्रदान सोहळाह्ण रंगला. व्यासपीठावर उपमहापौर भिकूबाई बागुल व अश्विनी बोरस्ते, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, डॉ. स्वप्नील बच्छाव, कवी जयश्री पाटील, दिलीप देशमुख, गणेश गिते, विठ्ठल चारोस्कर, सुवर्णा खंडेलवाल, मुकुंद देशमुख, नागनाथ भोगे, प्रतिभा म्हस्के, सीताराम भालेकर यांना जाणीव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष अर्चना पाटील, सचिव गौरव थोरात आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पल्लवी कुलकर्णी यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Provide state level awareness awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.