‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ येवल्यात योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 18:44 IST2020-09-12T18:43:33+5:302020-09-12T18:44:18+5:30
येवला : शहरात ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजनेचा शुभारंभ येवला पॉवरलूम सोसायटी संचिलत स्वस्त धान्य दुकानात पुरवठा निरीक्षक प्राजक्ता कुलकर्णी, उपलेखापाल बाळासाहेब हावळे यांचे हस्ते झाला.

‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ येवल्यात योजनेचा शुभारंभ
ठळक मुद्दे देशात कुठेही स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त धान्य घेता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शहरात ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजनेचा शुभारंभ येवला पॉवरलूम सोसायटी संचिलत स्वस्त धान्य दुकानात पुरवठा निरीक्षक प्राजक्ता कुलकर्णी, उपलेखापाल बाळासाहेब हावळे यांचे हस्ते झाला.
यावेळी शिधापत्रीका धारक व स्वस्त दुकानदार यांना वन नेशन वन रेशनकार्ड व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने बाबत उपलेखापाल हावळे यांनी मार्गदर्शन केले. सदर वन नेशन वन रेशन कार्ड योजनेत पात्र शिधा पत्रिका धारकांना देशात कुठेही स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त धान्य घेता येणार आहे. रोजगार वा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या, स्थलांतरीतांना याचा फायदा होणार आहे. शिधा पत्रिका बदलण्याची गरज राहणार नाही.